वरवंड, दि. २० (वार्ताहर) : कडेठाण (ता. दौंड) येथे नव्याने उभारण्यात आलेल्या श्री गणेश मंदिराचा कलशारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा पार पडला. या वेळी २१ जोडप्यांच्या हस्ते होमहवन व धार्मिक पूजा करण्यात आली. याप्रसंगी आमदार रमेश थोरात, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रामभाऊ टुले, अनुराज शुगर्सचे अध्यक्ष राजाराम बोरकर, ह.भ.प. शांतिनाथ महाराज यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी गणेशमूर्तीची गावातून टाळ-मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. या वेळी गावात सर्वत्र गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. सदरचे मंदिर उभारणेकामी १० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.
या मंदिराशेजारीच एक दत्तमंदिर आहे. या दत्त मंदिराच्या सभामंडपाचे काम कडेठाणचे सरपंच लक्ष्मण दिवेकर यांच्या देणगीतून झालेले आहे. या मंदिर उभारणीसाठी मंडळाचे अध्यक्ष पोपट धावडे, सचिव तुकाराम कुंजीर तसेच मंडळाच्या इतर कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळाले. या वेळी दूध संघाचे संचालक नानासाहेब फडके, बाजार समितीचे अध्यक्ष संभाजी फडके, सरपंच सागर फडके, पंचायत समिती सदस्य अप्पासाहेब पवार, कडेठाणचे उपसरपंच शिवाजी दिवेकर, पोलीस पाटील सुहास दिवेकर, प्रभाकर दिवेकर, काशिनाथ दिवेकर, जनार्दन कुंजीर, एल. टी. दिवेकर, हनुमंत वाबळे, कुंडलिक दिवेकर, गोरख दिवेकर, संतोष दिवेकर, राजेंद्र ढवळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
No comments:
Post a Comment