केडगाव, दि. २० (वार्ताहर) : शिक्षक हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. विद्यार्थ्यांवर खरे संस्कार शिक्षकाचे होतात. समाज जर सक्षम करायचा असेल, तर ती जबाबदारी शिक्षकांवर असल्याचे मत आमदार रमेश थोरात यांनी व्यक्त केले. चौफुला (ता. दौंड) येथील चेतना मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. तसेच यावेळी सभापती मधुकर दोरगे म्हणाले, की गेल्या पाच वर्षांपासून बंद असणारे पंचायत समितीचे आदर्श शिक्षक पुरस्कार लवकरच सुरू करणार आहोत. भविष्यात शिक्षकांनी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नशील राहावे, असे या वेळी ते म्हणाले. उद्योगपती विकास ताकवणे म्हणाले, की शिक्षक हा समाजोन्नतीसाठी प्रयत्नशील असला पाहिजे, असे सांगितले. या वेळी आमदार रमेश थोरात यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या वेळी पंचायत समितीतर्फे दादा दरेकर (होलेवस्ती), अनिता गायकवाड (राजेगाव) यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. याप्रसंगी विलास जाधव, अप्पासाहेब रणदिवे, नाना जोशी, महादेव माळवदकर यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रामभाऊ टुले, अप्पासाहेब पवार, सिधू रूपावर, उद्धवराव फुले, सोहेल खान, बादशहा शेख, भाऊसाहेब ढमढेरे, पाराजी हांडाळ, उत्तम ताकवले, शिवाजी वाघोले, प्राचार्य अरुण थोरात, शिक्षणाधिकारी एम. जी. आंबेडकर, गटशिक्षणाधिकारी जी. यू. बेलखेडे, अजित बलदोटा, नानासाहेब. फडके, रामदास दिवेकर, लक्ष्मण दिवेकर, विकास खळदकर, भानुदास नेवसे, शंकर टुले आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक अप्पासाहेब मेंगावडे, तर सूत्रसंचालन अशोक कदम यांनी केले, तर आभार प्रदीप वाघोले यांनी मानले. कार्यक्रमास शिवव्याख्याते श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान झाले.
हतबल शासन
महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती अध्यक्ष नाना जोशी यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राला पूर्णवेळ शिक्षणमंत्री नाही. ६० टक्के जिल्ह्यांमध्ये शिक्षणाधिकारी नाहीत, ७० टक्के ठिकाणी गटशिक्षणाधिकारी नाहीत, असे सांगून शासनाची हतबलता सांगितली
No comments:
Post a Comment