Monday, September 20, 2010
महा-ई सेवा केंद्र निश्चितच फायद्याचे : थोरात (21-09-2010 : 10:07:32) Lokmat
देऊळगावराजे, दि. २० (वार्ताहर) : दौंड तालुक्याच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी 'महा-ई सेवा केंद्र सुरू करण्यात येत असून, ही बाब निश्चितच समाधानाची असल्याचे मत आमदार रमेश थोरात यांनी व्यक्त केले. देऊळगावराजे (ता. दौंड) येथे महा ई-मेल सेवा केंद्राच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. ग्रामीण भागात ई-सेवा सुरू झाल्यामुळे ग्र्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी येण्या-जाण्याचा फेरफटका वाचलेला असून, आर्थिक नुकसानदेखील टळलेले आहेत. दौंडचे तहसीलदार हनुमंत पाटील यांच्या कार्याचे निश्चितच कौतुक करणे गरजेचे आहे. कारण त्यांच्या पुढाकाराने दौंड तालुक्याच्या ग्रामीण भागात महाराष्ट्र शासनाचे ई-सेवा केंद्र सुरू करण्यासाठी मोठी मदत होत आहे. मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सोसायट्यांचे सचिव यांनी जनतेची सेवा ही प्रामाणिकपणे केली पाहिजे, असे सांगून त्यांनी वरील कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली. यानंतर देऊळगावराजे ग्रामपंचायतीच्या वतीने पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धनाच्या हेतूने गावातील ग्रामस्थांना व शालेय विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला तहसीलदार हनुमंत पाटील, जिल्हा परिषदेतील गटनेते वीरधवल जगदाळे, उद्योगपती विकास ताकवणे, भाजपचे ज्येष्ठ नेते वासुदेव काळे, जिल्हा परिषद सदस्य संजय काळभोर, सरपंच अमित गिरमकर, रामभाऊ काळे, आर. के. मेढेकर, जे. एस. भोसले, अनिल ठोंबरे, दत्तात्रय गिरीमकर, लक्ष्मण कदम, वसंत धुमाळ, भरत गिरीमकर, तुकाराम आवचर, भानुदास औताडे, संतोष बोराडे, विष्णू सुर्यवंशी, भास्कर आवचर, श्यामराव आवचर, निलेश आवचर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चांगदेव गिरीमकर यांनी केले तर आभार राजेंद्र बुऱ्हाडे यांनी मानले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment