Monday, September 20, 2010

कडेठाणला गणेश मंदिर कलशारोहण lokmat

वरवंड, दि. २० (वार्ताहर) : कडेठाण (ता. दौंड) येथे नव्याने उभारण्यात आलेल्या श्री गणेश मंदिराचा कलशारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा पार पडला. या वेळी २१ जोडप्यांच्या हस्ते होमहवन व धार्मिक पूजा करण्यात आली. याप्रसंगी आमदार रमेश थोरात, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रामभाऊ टुले, अनुराज शुगर्सचे अध्यक्ष राजाराम बोरकर, ह.भ.प. शांतिनाथ महाराज यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी गणेशमूर्तीची गावातून टाळ-मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. या वेळी गावात सर्वत्र गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. सदरचे मंदिर उभारणेकामी १० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.
या मंदिराशेजारीच एक दत्तमंदिर आहे. या दत्त मंदिराच्या सभामंडपाचे काम कडेठाणचे सरपंच लक्ष्मण दिवेकर यांच्या देणगीतून झालेले आहे. या मंदिर उभारणीसाठी मंडळाचे अध्यक्ष पोपट धावडे, सचिव तुकाराम कुंजीर तसेच मंडळाच्या इतर कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळाले. या वेळी दूध संघाचे संचालक नानासाहेब फडके, बाजार समितीचे अध्यक्ष संभाजी फडके, सरपंच सागर फडके, पंचायत समिती सदस्य अप्पासाहेब पवार, कडेठाणचे उपसरपंच शिवाजी दिवेकर, पोलीस पाटील सुहास दिवेकर, प्रभाकर दिवेकर, काशिनाथ दिवेकर, जनार्दन कुंजीर, एल. टी. दिवेकर, हनुमंत वाबळे, कुंडलिक दिवेकर, गोरख दिवेकर, संतोष दिवेकर, राजेंद्र ढवळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

महा-ई सेवा केंद्र निश्चितच फायद्याचे : थोरात (21-09-2010 : 10:07:32) Lokmat

देऊळगावराजे, दि. २० (वार्ताहर) : दौंड तालुक्याच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी 'महा-ई सेवा केंद्र सुरू करण्यात येत असून, ही बाब निश्चितच समाधानाची असल्याचे मत आमदार रमेश थोरात यांनी व्यक्त केले. देऊळगावराजे (ता. दौंड) येथे महा ई-मेल सेवा केंद्राच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. ग्रामीण भागात ई-सेवा सुरू झाल्यामुळे ग्र्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी येण्या-जाण्याचा फेरफटका वाचलेला असून, आर्थिक नुकसानदेखील टळलेले आहेत. दौंडचे तहसीलदार हनुमंत पाटील यांच्या कार्याचे निश्चितच कौतुक करणे गरजेचे आहे. कारण त्यांच्या पुढाकाराने दौंड तालुक्याच्या ग्रामीण भागात महाराष्ट्र शासनाचे ई-सेवा केंद्र सुरू करण्यासाठी मोठी मदत होत आहे. मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सोसायट्यांचे सचिव यांनी जनतेची सेवा ही प्रामाणिकपणे केली पाहिजे, असे सांगून त्यांनी वरील कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली. यानंतर देऊळगावराजे ग्रामपंचायतीच्या वतीने पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धनाच्या हेतूने गावातील ग्रामस्थांना व शालेय विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला तहसीलदार हनुमंत पाटील, जिल्हा परिषदेतील गटनेते वीरधवल जगदाळे, उद्योगपती विकास ताकवणे, भाजपचे ज्येष्ठ नेते वासुदेव काळे, जिल्हा परिषद सदस्य संजय काळभोर, सरपंच अमित गिरमकर, रामभाऊ काळे, आर. के. मेढेकर, जे. एस. भोसले, अनिल ठोंबरे, दत्तात्रय गिरीमकर, लक्ष्मण कदम, वसंत धुमाळ, भरत गिरीमकर, तुकाराम आवचर, भानुदास औताडे, संतोष बोराडे, विष्णू सुर्यवंशी, भास्कर आवचर, श्यामराव आवचर, निलेश आवचर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चांगदेव गिरीमकर यांनी केले तर आभार राजेंद्र बुऱ्हाडे यांनी मानले.

शिक्षक समाजातील महत्त्वाचा घटक : थोरात

केडगाव, दि. २० (वार्ताहर) : शिक्षक हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. विद्यार्थ्यांवर खरे संस्कार शिक्षकाचे होतात. समाज जर सक्षम करायचा असेल, तर ती जबाबदारी शिक्षकांवर असल्याचे मत आमदार रमेश थोरात यांनी व्यक्त केले. चौफुला (ता. दौंड) येथील चेतना मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. तसेच यावेळी सभापती मधुकर दोरगे म्हणाले, की गेल्या पाच वर्षांपासून बंद असणारे पंचायत समितीचे आदर्श शिक्षक पुरस्कार लवकरच सुरू करणार आहोत. भविष्यात शिक्षकांनी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नशील राहावे, असे या वेळी ते म्हणाले. उद्योगपती विकास ताकवणे म्हणाले, की शिक्षक हा समाजोन्नतीसाठी प्रयत्नशील असला पाहिजे, असे सांगितले. या वेळी आमदार रमेश थोरात यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या वेळी पंचायत समितीतर्फे दादा दरेकर (होलेवस्ती), अनिता गायकवाड (राजेगाव) यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. याप्रसंगी विलास जाधव, अप्पासाहेब रणदिवे, नाना जोशी, महादेव माळवदकर यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रामभाऊ टुले, अप्पासाहेब पवार, सिधू रूपावर, उद्धवराव फुले, सोहेल खान, बादशहा शेख, भाऊसाहेब ढमढेरे, पाराजी हांडाळ, उत्तम ताकवले, शिवाजी वाघोले, प्राचार्य अरुण थोरात, शिक्षणाधिकारी एम. जी. आंबेडकर, गटशिक्षणाधिकारी जी. यू. बेलखेडे, अजित बलदोटा, नानासाहेब. फडके, रामदास दिवेकर, लक्ष्मण दिवेकर, विकास खळदकर, भानुदास नेवसे, शंकर टुले आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक अप्पासाहेब मेंगावडे, तर सूत्रसंचालन अशोक कदम यांनी केले, तर आभार प्रदीप वाघोले यांनी मानले. कार्यक्रमास शिवव्याख्याते श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान झाले.

हतबल शासन
महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती अध्यक्ष नाना जोशी यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राला पूर्णवेळ शिक्षणमंत्री नाही. ६० टक्के जिल्ह्यांमध्ये शिक्षणाधिकारी नाहीत, ७० टक्के ठिकाणी गटशिक्षणाधिकारी नाहीत, असे सांगून शासनाची हतबलता सांगितली

Saturday, July 31, 2010

दौंड तालुक्यात बहुतांशी ग्रामपंचायतींचे संमिश्र निकाल (लोकमत वर्तमानपत्र)

दौंड, दि. ३१ (वार्ताहर) : तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालापैकी बहुतांशी ग्रामपंचायतीत संमिश्र उमेदवार निवडून आले आहेत. ४६ ग्रामपंचायतींपैकी ४० च्यावर ग्रामपंचायती आपल्या समर्थकांच्या ताब्यात आल्याचा दावा आमदार रमेश थोरात यांनी केला आहे. तर निम्यापेक्षा जास्त ग्रामपंचायती आपल्या विचाराच्या असल्याचा भीमा-पाटस कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांचा दावा आहे. ग्रामपंचायतनिहाय निकाल पुढीलप्रमाणे -
प पाटस - बाळासाहेब तोंडे (६१०), सुमन भागवत (६८९), संभाजी चव्हाण (९५२), वैशाली वणवे (९०३), मंदा कड (९६६), आशा पानसरे (६४८), अनिल खंडाळे (६१८), शंकर बाबर (५५७), नागेश म्हस्के (११०४), राहुल गावडे (१०९१), गजानन शितोळे (७६६), संतोष शितकल (८५५), संभाजी देशमुख (८३५), रंजना भंडलकर (६७५), अण्णा तांबे (४४७), धुळा बरकडे (५१३), रंजना भागवत (८८४).
प भांडगाव - जगन्नाथ भिसे (२८०), उज्ज्वला दोरगे (२९७), अमोल जाधव (३३९), नितीन दोरगे (३०२), विलास कदम (१८१), मंगल अडसूळ (१८६), गंगुबाई शेळके (१९३), रवींद्र दोरगे (३७६), भालचंद्र ढोणे (३७१), रामदास हाके (३६३).
प वरवंड - सुधीर फरगडे (५६५), जयश्री भगत (५७५), बाळासोा. जगताप (६७०), शिवाजी शेलार (५२६), सोनाली खोमणे (६२८), बबन टेंगले (६५४), विलास दिवेकर (५७०), आरती फरगडे (६३४), पोपट पवार (७१८), प्रविण दिवेकर (६३०), जयश्री दिवेकर (८११), पंकज रणधीर (५१०), सिद्धार्थ रणधीर (४८६), माधवी फडके (५४४), शिवाजी बारवकर (६११), रामदास दिवेकर (६६५), माधुरी दिवेकर (६०५).
प लिगाळी - हरिश्चंद्र खोमणे (३८३), शुभल लोंढे (३३४), संजू गावडे (३९१), संचिता मेरगळ (४०९), बाळू गावडे (३८७), गुलाब काळे (४१४), सुहास जगदाळे (३५८), सविता जगदाळे (३७५), सुनील जगदाळे (४४९), राजू माने (३४४), सविता निमोणकर (४२३), अमोल भांडवलकर (४०९), सदाशिव पासलकर (४७८), अर्चना जगदाळे (४९८), धरम बनसोडे (५४२), संजय येडे (५५६).
प गोपाळवाडी - नारायण सुळ (५१८), नलिनी गिरमे (५०१), नानासाहेब पवार (१८२), विठ्ठल दरेकर (१८८), आशा शिदे (१९०), सुरेश गिरमे (२६७), गोरख होले (२७७), अरुणा होले (२६१), अशोक दीक्षित (३६०), वैशाली शिदे (३१०), आशा होले (४०१), विलास डोंगरे (१९७), दिलीप दोरड (१७९).
प नानगाव - राजेंद्र कोंडे (५०२), विक्रांत खळदकर (३८०), सविता गुंड (४४०), नारायण रासकर (४३६), विश्वास भोसले (५०४), संगीत खळदकर (४५०), राजकुमार मोटे (४१३), शितल शिंदे (४८२), अरुणा खळदकर (४२९), हरिभाऊ खराडे (३०६), विजय गुंड (२५१), दिपाली शिंदे (२६४), सचिन शेलार (१३९), विकास अडागळे (११८), विकास शेलार (१६९).
प कानगाव - सुर्यकांत मोरे (४५०), पांडुरंग गवळी (४५५), जयश्री फडके (४४९), प्रविण खोल्लम (४६३), उद्धव गवळी (४४६), राणी मळेकर (४९८), मारुती साळुंके (४२०), इंद्रायणी चाबुकस्वार (३८०), मनिषा फडके (३८६), संतोष फडके (२५१), शरद चौधरी (२४९), भानुदास फडके (२३६), शिवाजी चौधरी (२१३), बाळकृष्ण शेलार (१८४), चंद्रभागा कौले (२२५).
प भरतगाव - गोविद डोंबाळे (३१०), विलास जगदाळे (२८१), सुरेखा थोरात (२७१), प्रविण इंगळे (२७८), मारुती ढमाळ (२४२), मंगला टेमगिरे (२५१), वसंत बिचकुले (२१४), सविता गोईकर (२६०).
प खडकी - रवींद्र काळे (३३२), उषा मोरे (३३८), नागेश्वर गायकवाड (३४८), दिलीप शितोळे (३४९), राधिका आरेकर (३३३), राजेंद्र जगताप (४१७), बाळासाहेब गुणवरे (५०४), सुभाष दरेकर (४२४), उत्तम कळस्कर (५२८), महादेव कुचेकर (५१६), ज्ञानदेव शिदे (४७८), निशीगंधा कुदळे (६०७), उज्ज्वला काळभोर (६०९).
प कुसेगाव - स्वाती रुपनवर (२६६), बाळासाहेब शितोळे (२७४), मनिषा शितोळे (२८३), यशवंत भोसले (२७५), रमेश भोसले (३२२), अलका गायकवाड (४०७), रुक्मिणी पोळेकर (३२१), मनिष शितोळे (३४१), अनिता शितोळे (४१०).
प रावणगाव - कौशल्या आटोळे (२५५), अलका गाढवे (२६५), दिनकर आटोळे (३६९), नंदा आटोळे (३६८), बबन कांबळे (३४५), सुदाम फासगे (३२६), हौशीराम आटोळे (३५५), पांडुरंग रांधवण (५०४), विकास आटोळे (४६२), उज्ज्वला आटोळे (४९४).
प सहजपूर - सविता माखर (१६६), सविता दरेकर (१६२), जीवन म्हेत्रे (२१९), अनिल जगताप (१९२), मीनाबाई राऊत (२०७), शिवाजी म्हेत्रे (२९५), राजेंद्र म्हेत्रे (३०१), सुरेखा म्हेत्रे (३०६), श्रीकृष्ण शेलार (३८६), सीताराम वेताळ (३८४), दत्तात्रय थोरात (४०८).
प मळद - जयश्री साळवे (२८५), ज्ञानदेव शेलार (२७९), प्रदीप साळवे (२३२), समीर निबाळकर (३०४), संगीता जगताप (३०४), दत्तू दुधे (२६४), संतोष म्हेत्रे (२५८), आशालता शेलार (२५३), गजानन दुधे (२७२), कांता साळवे (२६५).
प खोर - बाळू चौधरी (४२५), शिवाजी पिसे (४१९), शुभदा चौधरी (४५०), दादा कुदळे (४२१), ज्ञानेश्वर चौधरी (३४१), लक्ष्मी माने (३८६), लक्ष्मण गायकवाड (४३३), विकास कुदळे (४३०), जयश्री चौधरी (४४०)
प पिपळगाव - सुरेखा शिदे (२६०), सुरेखा नातू (२४२), अर्जुन जगताप (४८८), किशोर शितोळे (४५९), ललिता गाडेकर (४८१), विकास जावळे (३२६), दत्तात्रय सावंत (३१३), निर्मल कदम (३००), बाळू ताम्हाणे (२८१), दिगंबर कापरे (२९९), जनाबाई शितोळे (३०१), नितीन थोरात (३९५), मनिषा जगताप (३८४)
प हातवळण - सागर फडके (२९५), अनिल गवळी (२७३), लताबाई (३१८), संजय शिदे (२०७), नवनाथ हाडके (२१४), शारदा फडके (१७०), संतोष जगताप (२१४), शैला गवळी (२२२).
प गिरीम - बाळासाहेब शिदे (१८६), लक्ष्मी थोरात (१६७), अर्जुन फुलारी (३७६), जालिदर मांढरे (३४५), कविता गोरे (२६८), दादासोा. जाधव (३५८), धनाजी शिगटे (३२८).
प टाकळी - भारती मेमाणे (१४६), बाबुराव नरसाळे (२४७), राधा ठाकर (२०९), शहाजी वडघुले (१३१).
प देऊळगावगाडा - अकबर शेख (३०३), रामदास डेंबाळकर (२२५), मारुती कोकरे (२०८), दत्तात्रय बारवकर (३०७).
प खानोटा - सतीश लोंढे (३५३), शंकर पानसरे (३८०), हनुमंत पवार (२८६), अशोक गायकवाड (२८०), शालन कन्हेरकर (३२४), भीमराव पवार (२५५), मानसिग माहूरकर (२६७), सुनिता भोसले (२८४).
प वडगावदरेकर - महेंद्र घोडके (२३२), सुखदेव वाघमोरे (२१२), मालन माने (२१४), युवराज नागवे (२०९), पोपट माने (२२७), शांताबाई नागवे (१७९), बाळा वाघमोरे (२२४), पांडुरंग बाराते (२१९), छाया कापसे (२४९).
प सोनवडी - नंदा शिंगाडे (२१३), सारिका कडू (२३३), प्रकाश नगरे (४२१), अमोल पवार (४१७), कल्पना काकडे (४५३), सुवर्णा सोनवणे (२५८), सोमनाथ सोनवणे (२४९), दादा लकडे (२६९), हिरालाल राठोड (२५४), महादेव राठोड (२२१), सोनाबाई चव्हाण (२३३).
प खामगाव - अनिता शिदे (४३९), स्मीता माने (४३७), तुकाराम मदने (४७३), राजाराम खेडेकर (४११), कैलास खेडेकर (३६६), निलम बहिरट (३७७), बाळासोा. कोळपे (६७०), दत्तात्रय तांबे (४३४), सुमिता कोळपे (५२८), हरिभाऊ जगताप (३९१), अजय थोरात (३९६), कमल कांचन (४४८).
प कासुर्डी - जितेंद्र सोनवणे (३०५), अलका ठोंबरे (३४८), अशोक होले (३४३), पांडुरंग आखाडे (२८५), सुनिता कसबे (३४१), संतोष आखाडे (४३५), तानाजी राजवडे (४१९), सविता अनपट (४६२), प्रतिभा भंडलकर (४९३), संतोष भिसे (४६२), रोहिणी आखाडे (४६२), कल्पना ठोंबरे (२५०), हेमलता गायकवाड (२५८).
प राजेगाव - पुष्पा भोंग (३०८), कल्पना खैरे (३३२), संतोष कदम (४२१), गुलाब मेंगावडे (३९४), रुक्मिणी पांडव (४१९), नवनाथ लोंढे (२६०), अरूण भोईर (२८३), अर्चना जाखळ (२९२), दत्ताजी मोघे (२५७), नवनाथ पानसरे (३२४), मुकेश गुणवरे (३१५), सोपान चोपडे (२७५), उषा टेंगले (२६८).
प नानविज - अर्जुन पासलकर (१४३), प्रफुल्ल पासलकर (१४७), अनिल जगताप (२४४), नानासोा. पाटोळे (२६१), सतीश पाटोळे (२३४)
प हिगणीगाडा - संजय गायकवाड (१९७), ललिता खराडे (१९३), संतोष मंडले (२१९), अनिल लवांड (२७१), आशा शिदे (२४४), दिलीप रणसिग (१४०), प्रियंका खराडे (१६७).
प स्वामी चिचोली - अझरुद्दीन शेख (२८०), गजानन ननवरे (२४९), रामचंद्र कुटे (२३६), इन्ताज मुलाणी (२८५), बिराजी लोंढे (१६५), विठ्ठल मदने (१८४), छाया कांबळे (३३३), चंद्रकांत होले (३४७).
प कौठडी - कांतीलाल मेरगळ (१४६), अनिता गावंडे (१३१), किसन आटोळे (१४३), हौसीराम आटोळे (१६९), लता मेरगळ (१३५), शालन मेरगळ (१६५), गुजाबा शिदे (१५६).
प गार - संतोष गावडे (४५३), भाऊसाहेब चौरे (२२२), तुकाराम पासलकर (२१९), शोभा सुर्वे (२१४), लता लोंढे (३०५).
प शिरापूर - सूलोचना सातव (१४०), चंद्रशेखर ठोंबरे (२४९), बंडू शिदे ९३१), हरिभाऊ पानवकर (२२७), बाबुराव डाळिबे (१८६), केशव काळे (२१७), जयश्री डाळिबे (१७२). उंडवडी - सुनील जगताप (२३६), मुरलीधर भोसले (२१४), छाया निवंगुणे (२२९), वसंत कांबळे (१५८), रोहिदास जाधव (२०९), रामचंद्र दोरगे (१९८), लक्ष्मण भंडलकर (१९३), अश्विनी नवले (१७३).
प खोरवडी - जनार्धन जाधव (३९४), शिवाजी आव्हाळे (३७६), वनिता चव्हाण (४२५), राजेंद्र गुन्नर (२८९), दादा मराडे (२८२), लक्ष्मीबाई सोनवणे (२७१).
प मिरवडी - बाळू शिदे (१८७), सुनिता वाघमोडे (१९१), तुळशीराम थोरात (२७७), तुकाराम कडे (२५२), शोभा मेमाणे (२५२), सारिका मेमाणे (१८१), तुकाराम शेंडगे (१८३).
प आलेगाव - प्रियंका रणशिगारे (४०७), भानुदास ढमढेरे (३८७), हेमंत कदम (१६९), लक्ष्मण कदम (३०६), संतोष इंगोले (३०२), अशोक कदम (२७८)
प लडकतवाडी - गणेश लडकत (१८२), मिनाक्षी लडकत (१७०), किसन लडकत (१४८), संजय होले (१३९), सिधू लडकत (१४३), योगेश लडकत (१६६), माया कोल्हे (१५७).
प वाळकी - बाजीराव कदम (३४६), योगेश भालेराव (३६५), राजेंद्र जोंधळे (२२१), ज्ञानेश्वर काळे (२०२), नबाबाई चोरमले (२११), विठ्ठल थोरात (३७१), रंजना कदम (३३१).
प नंदादेवी - राहुल गावडे (१५३), भाऊसोा. धावडे (१५३), वैशाली आटोळे (१५३), निळकंठ गाढवे (१५८), महादेव सांगळे (१६०), सुनिता चव्हाण (१५९), मारुती कोकणे (३०४), संजय नांगरे (२८७), चंद्रभागा कोकणे (२९५).
प पडवी - संगीता गायकवाड (३२४), पोपटराव डेंबळकर (३०१), भाऊसोा. बारवकर (२९४), विमल निबाळकर (२९३).
प कडेठाण - सुंदर दिवेकर (२८५), सतीश कोऱ्हाळे (२७१), पुष्पा दिवेकर (२६९), लक्ष्मण दिवेकर (३२०), राजाराम दिवेकर (३०५), निर्मला गोसावी (३२४), शिवाजी दिवेकर (४५२), संगीता बनकर (४३१), संजय रणधीर (४३१).
प बोरीबेल - अनिता मोरे (३५६), अंजना पाचपुते (३२४), अरविद जगताप (३५९), मच्छिंद्र पोटे (३५२), बापू दिवेकर (३३०), सुनील गावडे (३३२), वासुदेव आवचर (२७८), अंजना धुमाळ (३२५), दत्तू जेडगे (२९६), ज्ञानेश्वर जगताप (२७०), हिराबाई आटोळे (२८०).
प ताम्हाणवाडी - संदीप ताम्हाणे (१३४), बेबी हिगणे (१३१), दिलीप ताम्हाणे (१४४), सुनील ताम्हाणे (१३९), कमल ताम्हाणे (१५२), रत्नाकर जाधव (५७), ज्योती ताम्हाणे (६०). http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=PuneEdition-4-1-31-07-2010-ce427&ndate=2010-08-01&editionname=pune